शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सफाई कामगाराचा सत्कार

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सफाई कामगाराचा सत्कार
 लातूर -शिवसेना पक्षप्रमख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सौ. सुनिता चाळक यांच्या निवास्थानी सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख सुनीताताई चाळक यांच्या वतीने लातूर महापालिकेच्या सफाई कामगाराचा फेटा बांधून तर महिलांचा साड्या देऊन सत्कार शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
 शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा कार्यक्रम घेऊन जे वंचित कर्मचारी आहेत आणि खऱ्या अर्थाने तेच शहर स्वच्छ ठेवायचे महत्त्वाचे काम करतात अशा व्यक्तीवर मायेची थाप मारून त्यांना आधार द्यायचे काम माजी नगरसेवक सौ. सुनीता चाळक यांच्या वतीने करण्यात आले.
      यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी ,माजी जिल्हाप्रमुख नामदेव चाळक ,महिला जिल्हा संघटक सुनीता चाळक, शहरप्रमुख रमेश माळी ,सि के मुरलीकर ,एस .आर.चव्हाण ,व्यापारी आघाडी प्रमुख बसवराज मंगरुळे, युवा सेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, रफिक नाना ,ॲड.नरेश कुलकर्णी राहुल रोडे, खंडू जगताप, सागर चाळक, सिद्धेश्वर जाधव ,आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने