श्री माधवराव पाटील महाविद्यालयात प्रेमचंद मुंशी यांची जयंती साजरी

श्री माधवराव पाटील महाविद्यालयात प्रेमचंद मुंशी यांची जयंती साजरी 
 मुरूम(प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात हिंदी पदवी-पदव्युत्तर विभागामार्फत मंगळवारी (ता. १) रोजी मुंशी प्रेमचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रेमचंद यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागोराव बोईनवाड, डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. रमेश आडे, डॉ. महादेव कलशेट्टी, डॉ. राजू शेख, एनएपीचे जिल्हा सदस्य डॉ. महेश मोटे, डॉ. शिला स्वामी, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, महाविद्यालयाचे एनएपीचे समन्वयक डॉ. सुशील मठपती, डॉ. सुजित मिटकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने