श्रीनृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन सोनवळकर

श्रीनृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नितीन सोनवळकरऔसा/प्रतिनिधी-श्री नृसिह देवस्थान माळी गल्ली, औसा येथे 19 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या श्री गणेश उस्तवनिमित्त श्री नृसिह गणेश मंडळाची बैठक संपन्न. आज श्री नृसिह देवस्थान माळी गल्ली, औसा येथे 19 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या श्री गणेश उस्तवनिमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रती वर्षां प्रमाणे याही वर्षी श्री नृसिह गणेश मंडळाचे कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये *अध्यक्ष श्री नितीन माणिकराव सोनवळकर, उपाध्यक्ष श्री अमोल भागवत माळी व श्री अनिकेत जयराज लद्दे, सचिव श्री अजय रवींद्र फुटाणे व श्री मंगेश उमाकांत औटी , कोषाध्यक्ष श्री केदार संजय जोशी व श्री भैरु बाबुराव यादव व मिरवणूक प्रमुख म्हणून श्री परमेश्वर हरिशचंद्र फुटाणे * यांची निवड करण्यात आली. या बैठकी वेळी सचिन माळी , चांगदेव फुटाणे, प्रकाश फुटाणे, कमलाकर फुटाणे, मनोज फुटाणे, पियुष म्हेत्रे, आकाश फुटाणे, विशाल फुटाणे, प्रसाद फुटाणे,वैभव वडगावे, गणेश फुटाणे व सर्व श्री नृसिह गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष पदाधिकारी व माळी गल्ली येथील सर्व गणेश भक्त उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने