चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनिता आरळीकर यांनी घेतली भेट

 चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या

माजी अध्यक्षा सुनिता आरळीकर यांनी घेतली भेट



लातूर प्रतिनिधी-विलास सहकारी साखर कारखाना निवळीच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांची लातूर जिल्हा महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा महाराष्ट्र
राज्य हाउसिंग फायनान्स कार्पोरेशन मुंबईच्या संचालिका सुनिता आरळीकर
यांनी शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेऊन
त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.

 यावेळी विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांनी लातूर जिल्हा महिला  काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुनिता आरळीकर
यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लातूर जिल्हा परिषदेच्या
माजी सदस्या आशा चव्हाण,लातूर पंचायत समितीच्या माजी सदस्या सिमा
क्षिरसागर उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने