जंगम समाज बांधवांकडून प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ यांचा सत्कार

जंगम समाज बांधवांकडून प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ यांचा सत्कार
 मुरूम (प्रतिनिधी) : येथील अक्कलकोट रोड लगत असणाऱ्या स्वामी निवास येथे  ज्यांना नुकतीच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामार्फत उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. राजशेखर हिरेमठ यांना गौरविण्यात आले होते. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मुरुम येथील जंगम समाजबांधवांकडून मल्लया स्वामी (पुरोहित) यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. हिरेमठ, प्रा. डॉ. शिला स्वामी सपत्नी सन्मानचिन्ह, स्वामी विवेकानंदाची मूर्ती व संपूर्ण कपड्यांचा आहेर करून सत्कार करण्यात आला. यावेळी गुरलिंगया स्वामी (पुरोहित), सहशिक्षक विजयकुमार स्वामी, दयानंद स्वामी, राजशेखर हिरेमठ, माजी सैनिक विजयकुमार हिरेमठ, सिद्धू स्वामी, प्रा. कल्लय्या स्वामी, शिवकुमार स्वामी, शिवानंद स्वामी, डॉ. महेश स्वामी, प्रकाश रोडगे, डॉ. नितिन डागा, मल्लिकार्जुन स्वामी, वीरभद्र स्वामी, महाअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, बसव प्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. रामलिंग पुराणे, महंमद ढोबळे, डाॅ. पौर्णिमा स्वामी, लक्ष्मी मुलगे, जयश्री स्वामी, साक्षी चटगे, सुकन्या स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रा. स्वामी यांनी प्रास्ताविक केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य हिरेमठ म्हणाले की, समाजबांधवांनी केलेल्या सत्कारामुळे मला अजून काम करण्याची ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याने माझी अधिक जबाबदारी वाढली आहे. या पुढच्या काळात ही मी अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. डॉ. स्वामी यांनी देखील यावेळी सत्काराप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचलन व आभार प्रा. शिवकुमार स्वामी यांनी मानले. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने