सरकारचा शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही-खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

सरकारचा शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही-खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

 

 धाराशिव-धाराशिव जिल्ह्याचे खा.ओमराजे निंबाळकर यांनी भूम तालुक्यात दौरा दरम्यान सरकारचा शेतकऱ्यावरील अन्याय सहन करणार नाही असा खरपुस समाचार घेतला सरकार  शेतकऱ्यांच्या संदर्भात सातत्याने अन्यायकारक भूमिका घेत असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे. सोयाबीनचे दर तसेच टोमॅटो आयात धोरण कांदयावरती 40 टक्के पेक्षा जास्त निर्यात कर लादून सरकार शेतकऱ्यांवरती अन्याय करत आहे. भूम तालुक्यातील दौऱ्या दरम्यान बोलताना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  मी सर्वसामान्य जनतेचे व गोरगरिबांची कामे तत्काळ व्हावीत या उद्देशाने लोकांचे फोन कॉल घेऊन कामे केल्याने अनेकांच्या पोटात भितीचा गोळा फिरत आहे. या भिती पोटीच माझी ग्रामपंचायतची निवडणूक लढविण्याची  लायकी नसल्याचे विधान केले. पण सन 2009 मध्ये मी लोकाशिर्वादाने विधानसभेचा आमदार होतो, विधानपरीषदेचा नव्हे याचा सविस्तर विसर पडलेला आहे. तसेच माझे दिवंगत वडिल यांच्यावर यापुढे कोणी टिका केल्यास त्याला समजेल अशा भाषेतच उत्तर दिले जाईल   असे उदगार काढले आहे.

धाराशिव जिल्ह्याचे खा.ओमराजे निंबाळकर यांनी भूम तालुक्याचा झंजावती दौरा करून विविध कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. खासदार साहेब ‌यांनी‌ सकाळी ‌भूम येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन फलकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहिले यानंतर,भूम येथील एमआयडीसी भागात उभारलेल्या स्वस्त मानस व्यसनमुक्ती केंद्रास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. मौजे उळूप तालुका भूम येथे शिवसेना युवासेना व किसान सेना यांच्या नूतन फलकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहून खासदार ओमदादा यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मौजे वालवड तालुका भूम या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नूतन फलकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहिले. पाठसांगवी तालुका भूम येथे शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नूतन फलकाच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहिलो. मुख्य कार्यक्रम असलेल्या पाटसांगवी तालुका भूम या ठिकाणी सर्व गावकरी व परिसरातील नागरिकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्र चिकिस्तक तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप अधि कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. मौजे हिवर्डा तालुका भूम येथे युवा सेनेच्या नूतन शाखेच्या फलकाचे अनावरण याप्रसंगी उपस्थित राहिले. मौजे ईराचीवाडी तालुका भूम येथे अखंड

 

हरिनाम सप्ताहाच्या  समाप्ती सोहळ्यास उपस्थित राहून गावकऱ्यांशी संवाद साधला. मौजे नागेवाडी तालुका भूम या ठिकाणी सर्व गाव साथीच्या आजाराने त्रस्त असल्याने जिल्ह्याचे खासदार ओम दादा यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्या ठिकाणी उपचार व तसेच प्रतिबंधात्मक उपाय आधीची माहिती जाणून घेतली. मौजे झेंडेवाडी तालुका भूम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारंभास उपस्थित राहून गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मौजे बेलेश्वर तालुका भूम येथे श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या सप्ताह उपस्थित राहून भाविकांना शुभेच्छा याप्रसंगी दिल्या. जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रम‌ यशस्वी संपन्न झाले तसेच तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शाखाप्रमुख व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. 

  या कार्यक्रमास उपस्थिती म्हणून त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख तथा युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे,तालुकाप्रमुख श्रीनिवास जाधवर,शिवसेना तालुकाप्रमुख परांडा श्री मेघराज दादा पाटील,नेत्र रोग तज्ञ बाळासाहेब घेंबाड,विधानसभा समन्वयक दिलीप साळू महाराज,शहर प्रमुख श्री प्रकाश अकरे,महिला आघाडी तालुकाप्रमुख उमाताई रणदिवे,माजी तालुकाप्रमुख श्री अनिल दादा शेंडगे,विधानसभा युवा अधिकारी श्री प्रल्हाद अडागळे,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री उमेश जाधवयुवासेना तालुकाप्रमुख श्री सुधीर ढगे,शहर प्रमुख श्री अविनाश जाधव,उपतालुकाप्रमुख श्री रामभाऊ नाईकवाडी,श्री अब्दुल सय्यद,ज्येष्ठ नेते केशव नाना चव्हाण,श्री अविनाश गटकळ,श्री राजाभाऊ नलावडे,रफिक तांबोळी,सुबुगडे काकानाईकवाडी सर,श्री शंकर गपाट,मा.सरपंच सदानंद जोगदंड,बाळासाहेब वरळे,हनुमंत सानप,श्री तात्या कांबळे,श्री अमोल अशोक वनवे,श्री आकाशराव शेळके,श्री संभाजी नाईकनवरे,श्री बाबा नाईकदी,श्री सुजित गोरे,श्री सागर मुंडे,श्री महेश मुंडे,श्री अशोक पन्हाळे,श्री शेखर वाघमारे,श्री विजय पन्हाळे,श्री अशोक सपकाळ,श्री जयराम गायकवाड,श्री बंकट देवरे,श्री लिंबराज गपाट,श्री अशोक साळुंखे,श्री प्रमोद भोसले,श्री अशोक माने,श्री चंद्रकांत चव्हाण,जावेद तांबोळी तांबोळी,बळीराम गटकळ,विनोद रेडे,संतोष हराळ‌ यांच्यासह सबंध तालुक्यातील गावकरी शिवसेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक आदींनी यामध्ये मोठा सहभाग नोंदविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने