सुरेश बिराजदार यांचा वाढदिवस मुरूम शहरात विविध उपक्रमांनी साजरा

सुरेश बिराजदार यांचा वाढदिवस मुरूम शहरात विविध उपक्रमांनी साजरा
मुरूम, ता. उमरगा, ता. २० (प्रतिनिधी) : जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशदाजी बिराजदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविवारी (ता. २०) रोजी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. नेहरूनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच बाबा जाफरी यांची उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी व सुनील साळुंखे यांची लोहारा तालुका अध्यक्षपदी नूतन निवड झाल्याने त्यांचा रफिक पटेल यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला. यावेळी बाबा जाफरी, सुनील साळुंखे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विठ्ठल पाटील, तानाजी भाऊ फुगटे, रफिक पटेल, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहर उपाध्यक्ष जावेद ढोबळे, लालपाशा जमादार, इमरान सय्यद, श्रीधर इंगळे, धनराज सावंत, मोहित शिंदे, सलीम मुल्ला, बालाजी मंडले, मशाक पटेल, शाहरुख पटेल, खाजाभाई नुरसे, महेबूब महाबुसे, करीमभाई मोगले, महेबूब ढोबळे, अमीर मुल्ला, सुलेमान मोगले, अहेमद शेख, युसुफ सय्यद, सुफियान सय्यद, आकीब पटेल, सुलेमान पिंजारी, राजू बंकलगी, उस्मान कुरेशी, मारुती कदम, अमीर मोगले, बिलाल पटेल यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने