उदगीर येथे होणार्या वीरशैव लिंगायत वधूवर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी
उदगीर - लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वा. शिवपार्वती मंगल कार्यालय, बिदर रोड उदगीर येथे होणार्या पाचव्या राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असल्याचे लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी सांगितले.
या वधू-वर परिचय मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेशातून वधू-वर व पालक उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याचे उद्घाटन माजलगावचे प्रसिध्द उद्योजक रामेश्वरअप्पा कानडे यांच्याहस्ते होणार असून हावगीस्वामी मठाचे स्वामी शंभुलिंग शिवाचार्य महाराज, शि.भ.प.किर्तन केसरी भगवंतराव पाटील चांभरगेकर महाराज, प्रदेशाध्यक्ष किर्तनकार महाराज मंडळाचे शि.भ.प.शिवराज नावंदे,कर्नल सचिन रंडाळे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.मनोहर पटवारी, माजी आ.सुधाकर भालेराव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, बी.आर.एस.चे अॅड.मल्लिकार्जुन करडखेलकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळगावेकर, सहयोग बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने, शांतीवीर पाटील मोघेकर, अॅड.सुरेश पाटील चिघळीकर, माजी सभापती सिध्देश्वर पाटील, भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश पाटील, मातृभुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश उस्तुर्गे, डॉ.संतोष बिरादार, लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष करीबसवेश्वर पाटील, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, जिल्हा मार्गदर्शक नागनाथप्पा भुरके आदि.प्रमुख पाहुणे म्हणून तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी लिंगायत महासंघाचे अनेक जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष तसेच लातूर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नुतन जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकार्यांचा व जेष्ठ साहित्यीक शकुंतलाबाई नागराळे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश गुळवे गुरूजींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अनुभवमंटप निलंगा येथील महिला मंडळाच्यावतीने सामुहिक इष्टलिंग पुजा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रकांत कालापाटील, चंद्रकांत शिरसे, सुभाष शेरे, बसवराज ब्याळे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा