संधीचे सोने करू..!"

"संधीचे सोने करू..!"
- जे.एस.पी.एम शिक्षण संस्था संचलित रेणापूर तालुक्यातील शिवाजी विद्यालय बिटरगाव या शाळेच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.अजितसिंहजी पाटील कव्हेकर साहेबांनी दिली व नव्या संकल्पसिद्धीकडे आमची वाटचाल सुरू झाली.शाळा हे मंदिर आणि विद्यार्थी हे दैवत मानून शैक्षणिक दीपस्तंभ निर्माण करण्याचा संकल्प केला आहे.ग्रामीण भागातील लोकजीवनाशी नाळ जोडून पालकांच्या अंतःकरणात जे.एस.पी.एम च्या उद्धिष्ठानुसार तेजस्वी विद्यार्थी घडवण्याची चेतना जागृत करणारी भावना रुजविण्याचे कार्यही शाळेची सर्व टीम करणार आहे. मा.अजितभैया साहेबांचा विश्वास सार्थ करण्यासाठी सदैव प्रयत्नशील व तत्पर राहून शैक्षणिक कार्य करणे व शाळा अग्रमानांकित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मुख्याध्यापक म्हणून संस्था,शाळा,पालक,विद्यार्थी यांच्या समन्वयातून संधीचे सोने करू अशी ग्वाही देतो. मुख्याध्यापक पदाची संधी दिल्याबद्दल लोकनेते,माजी आमदार मा.श्री.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब,सचिवा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर मॅडम,उपाध्यक्ष मा.श्री.अजितभैया पाटील कव्हेकर साहेब,कार्यकारी संचालक मा.रंजीतभैया पाटील साहेब,समन्वयक-संचालक मा.निळकंठराव पवार साहेब, फायनान्स डायरेक्टर मा श्री बापूसाहेब गोरे सर, संस्था समन्वयक प्रा विनोद जाधव सर,प्राचार्य श्री गोविंद शिंदे सर,प्राचार्य मारुती सूर्यवंशी सर, यांचेही आभार व्यक्त करतो व आपल्या कार्यास दृढसंकलित होतो.धन्यवाद🙏🙏🙏
           - सूर्यकांत चव्हाण
              (मुख्याध्यापक)
शिवाजी विद्यालय, बिटरगाव
ता.रेणापूर,जि. लातूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने