स्वातंत्र्यसैनिक कै. केशवराव दासमे यांच्या योगदानाबद्दल विविध उपक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यसैनिक कै. केशवराव दासमे यांच्या योगदानाबद्दल विविध उपक्रमाचे आयोजन                 मुरुम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील 
कोराळा येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक कै. केशवराव दासमे यांच्या मराठवाडा मुक्तीसंग्रामातील योगदानला उजाळा देण्याकरिता रविवारी ( ता. १७)रोजी युवक काँग्रेस व लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या व स्वातंत्र्यसैनिक कै. केशवराव दासमे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मातोश्री काशीबाई बिराजदार प्रशालेतील विद्यार्थ्यांची निंबध स्पर्धा संपन्न झाली. या मध्ये गणेश गायकवाड, अभिनव जाधव, मयुरी सुरवसे, सुरज सुरवसे या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेकडून शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस तथा संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे, परमेश्वर जाधव, सचिव रवि दासमे, जीवन शिंदे, अशोक दासमे, बबन भगत, अण्णाराव माने, अण्णाराव साळूंके, दत्तात्रय दासमे, प्रकाश सुरवसे, विष्णू साळूंके, राजेंद्र सुरवसे, अमित चव्हाण, प्रेमनाथ दासमे, कार्तिक पवार, रामकृष्ण दासमे, सतिश गायकवाड, सुभाष भगत, प्रदिप मोरे, शाहुराज चव्हाण, मुख्याध्यापक सुशिल चव्हाण, जपान अडसुळे, भास्कर राठोड, महेश कांबळे, प्रताप चव्हाण, किशोर वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.     फोटो ओळ : कोराळ, ता. उमरगा येथील लोककल्याण सामाजिक संस्थेकडून स्वातंत्र्यसैनिक कै. केशवराव दासमे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने