जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन 
 मुरुम (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव व महात्मा गांधी जयंती निमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सदर शाळा स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करता यावेत, सध्या विद्यार्थी मोबाईलमध्ये व्यस्त झाले आहेत. त्यांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध विषयांवर स्पर्धचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षित बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये लहान गट (इ. ४ थी ते ७ वी) प्रथम ३०७५ रुपये, द्वितीय २०७५ रुपये व तृतीय पारितोषिक १०७५ रुपये. या स्पर्धेतील विषय माणूस मोबाईलच्या आहारी, मी मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक बोलतोय, देशाला वैज्ञानिक विचारांची गरज व मोठा गट (इ. ८ वी ते १० वी) प्रथम ४०७५ रुपये, द्वितीय ३०७५ रुपये व तृतीय पारितोषिक २०७५ रुपये. या स्पर्धेतील विषय निवडणूक एक राष्ट्रीय कर्तव्य, महात्मा गांधीजी व आजचा भारत, महिलांना आरक्षण पण संरक्षण आहे का ? असे आहेत. ही स्पर्धा केंद्रप्रमुख बालाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित पाटील मित्रमंडळ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी पुढाकार घेतला आहे. ही स्पर्धा सोमवारी (ता.२५) रोजी असून या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी नावनोंदणी (ता. २३) पर्यंतच करावी. तेव्हा तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक बालाजी भोसले व केंद्रीय मुख्याध्यापक नबिलाल शेख यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने