परिस्थितीवर मात करतो तो यशस्वी होतो- पोलीस निरीक्षक प्रतिभा पाटील
बाभळगाव : " विविध स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी यशस्वी होत आहेत. आपली परिस्थिती कितीही वाईट असली तरी तिचा बाऊ न करता विद्यार्थी त्यावर मात करून यशस्वी होत आहेत." असे प्रतिपादन गांधी चौक पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक प्रतिभा ठाकूर यांनी व्यक्त केले.
दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ,
बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास विभागाच्या वतीने आयोजित
" स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन " या विषयावर प्रतिभा ठाकूर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे होते.
पुढे बोलताना प्रतिभा ठाकूर म्हणाल्या की," शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण मूळ संकल्पना समजून घेतल्या तर पुढे आपणाला त्याचा परीक्षेमध्ये खूप उपयोग होतो. आपल्याकडील सगळ्या स्पर्धा परीक्षा या आव्हानात्मक आहेत. त्यासाठी अभ्यासाची बैठक महत्त्वाची आहे."अध्यक्ष स्थानावरून 'स्पर्धा परीक्षेचे महाविद्यालयात होणारे नियमित तास याबद्दल समाधान व्यक्त करून ' प्राचार्य कटारे म्हणाले," स्पर्धा परीक्षेला आता पर्याय उरला नाही. विद्यार्थी आणि स्पर्धा ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. उपलब्ध भौतिक सुविधांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले यश संपादन केले तरच येणारा काळ त्यांच्यासाठी सुखकर असेल."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. रणजीत जाधव यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संतोष कल्याणकर यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस शिपाई केंद्रे साहेब, डॉ. वैशाली माढेकर, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. हरिहर गायके, प्रा. महारुद्र बिडवे यांची उपस्थिती होती. शेवटी सर्वांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दशरथ भिसे यांनी मांनले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा