आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज चे क्रीडा स्पर्धेत घवघवीत सुयश

आबासाहेब इंग्लीश स्कूल अँड ज्यू कॉलेज चे क्रीडा स्पर्धेत घवघवीत सुयश
देवणी/प्रतिनिधी -तालुक्यातील वलांडी येथील श्री व्यंकटेश मा. विद्यालय वलांडी येथे शालेय तालुकस्तरीय मैदानी स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आबासाहेब इंग्लिश स्कूल एण्ड ज्यु कॉलेज देवनी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला होता.या तालुकस्तरीय मैदानी स्पर्धेत आबासाहेव इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्यु कॉलेज देवनी येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली .
या स्पर्धेत 17 वर्ष वयोगट 400 मीटर धावने या स्पर्धेत खुळे अभिषेक पहिला क्रमांक पटकावला तर 14 वर्ष वयोगट 600 मीटर धावने यात आदर्श कातरे द्वितीय क्रमांक आला ,17 वर्ष वायोगट 1500 मीटर धावने यामधे तुरेवाले सुशांत हा द्वितीय क्रमांकावर आला, व 19 वर्ष वायोगटात 3000 मीटर धावने यामध्ये दुधभाते करण हा द्वितीय क्रमांक आला आहे तर 17 वर्ष वायोगटात 5000 मीटर चालने यात बिरादार कृष्णा हा पहिला तर कोनाले श्रीनिवास द्वितीय क्रमांकावर आले आहेत. तसेच 14 वर्ष वयोगटात 80 मीटर धावने अडथळा यामध्ये प्रथमेश सुर्यवंशी हा प्रथम क्रमांकावर आला आहे तर 17 वर्ष वयोगटात 110 मीटर धावने अडथळा यामध्ये घोडके ओमकार हा  पहीला तर भुसारे सिद्धरामेश्वर हा द्वितीय क्रमांक आला आहे.19 वर्षे वयोगटात 110 मीटर धावने अडथळा यात कुसनुरे कृष्णा हा पहील्या कृमांकावर बाजी मारली आहे . तर 14 वर्ष वयोगटात उंचउडी यामध्ये म्हेत्रे परमेश्वर हा पहीला तर नळगीरे साईप्रसाद हा द्वितीय क्रमांकावर बाजी मारली आहे . इयत्ता सहावी वर्गातील समर्थ सुर्यवंशी याने थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
  जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर व तसेच प्राचार्य राहुल बालुरे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने