उदेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव बिरादार यांचा ७१ वा वाढदिवस आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात

उदेश्वर  शिक्षण संस्थेचे सचिव  बिरादार यांचा ७१ वा वाढदिवस आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात
देवणी/प्रतिनिधी-तालुक्यातील सावरगाव येथील उध्देश्वर शिक्षण संस्थेचे सचिव काशिनाथराव बिरादार यांचा ७१ वा वाढदिवस व शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन बंडरे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी उध्देक्ष्वर शिक्षण संस्थेच्या भव्यदिव्य प्रांगणात संस्थेच्या व सर्व शिक्षकांच्या वतीने साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावरगावच्या विकासात त्याचा सिंहाचा वाटा असून ते विविध कार्यकारी सोसायटीचे ३५ वर्ष चेअरमन म्हणून जसे की गोरगरिबांना रेशन वाटप व शेतकर्यांना अंजुमन वाटपात निष्कलंक सेवा पार पाडली . सावरगावचे सरपंच म्हणून २०वर्ष सेवा केली. पंचायत समिती उदगीर चे सदस्य म्हणून ते उत्कृष्ट कार्य केले या काळात त्यांनी बेघरांना ६०-७०घरकुल मंजूर करून गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून दिले या काळात त्यांनी केलेले सिमेंट रस्ते आजही मजबूत आहेत त्यांच्या या यशस्वी कार्यकाळात गावात जिल्हा मध्यवर्ती बँक उपलब्ध करून दिली व शाळेच्या बाबतीत दहावी व बारावी कला वाणिज्य शाखा सुरू केले तसेच मोघा येथे विवेकानंद विद्यालयाची निर्मिती केली व विध्यार्थ्यांना परिक्षा सेंटर सुध्दा मिळवून घेतले सतत गावातील विकासात्मक जडणघडणीत ते अग्रेसर असत या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे मान्यवर विश्वनाथ खवले विश्वनाथ देशपांडे रामचंद्र पांचाळ अशोक बिरादार गोरख मोरे सर श्रीमंत सावरगावकर, नेताजी नराचे मोघेकर शाळेचे प्राचार्य नवनाथ खुळे सर उध्देक्ष्वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग बिरादार .प्रा दिपक पाटील.प्रा दिपक जाधव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक घडले सर ,विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक बालुरे सर,प्रा मुरहारी माने सर ,प्रा अनिल पाटील सर.नराचे सर सुर्यवंशी गौतम सर .मोरे सर .डॉ प्रा. राठोड सर ,प्रा गिरी सर ,प्रा. कांबळे सर देवके सर प्रा ढगे सर पांचाळ सर श्रीमती सूर्यवंशी मॅडम बांगे मॅडम बिरादार मॅडम जमादार मॅडम कल्याणी मॅडम राखेवार मॅडम आदी. उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शिवाजी बिरादार सर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने