अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात संपन्न

अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात संपन्न 
औसा -तालुक्यातील नांदुर्गा येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता भक्तिमय वातावरणात पार पडला.यावेळी हभप महेश महाराज माकणीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व विठ्ठल नामाच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते.
यावेळी औसा तालुक्याचे आ.अभिमन्यू पवार हे  कीर्तनाच्या व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच नांदुर्गा सरपंच अश्विनी ज्योतीराम घाडगे यांच्या संकल्पनेतून नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या आदर्श सून या पुरस्काराची मानकरी असलेल्या नांदुर्गा येथील भाग्यश्री चव्हाण यांना आ.पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने