सर्वाधिक ऊस दर दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री आ. अमित देशमुख व चेअरमन वैशाली देशमुख यांचा सत्कार

सर्वाधिक ऊस दर दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने माजी मंत्री आ. अमित देशमुख व चेअरमन वैशाली  देशमुख यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) :विलास सहकारी साखर कारखाना ली. कडून गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक ऊस दर दिल्याबद्दल ऊस उत्पादकशेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व विलास कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव यांचा सत्कार करण्यात आला.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे. गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी कडून प्रति मे.टन २८५२ रूपये तर विलास सहकारी साखर कारखाना, युनीट – २ तोडार, उदगीर कडून प्रति मे.टन २६७९ रूपये उच्चांकी ऊसदर दिला आहे. या बददल ग्रामपंचायत शिऊर येथील सरपंच सचीन सुर्यवंशी व सदसय, ग्रामपंचायत खुटेफळ येथील सरपंच यशवंत शिंदे, बाळासाहेब पाटील, दिंगाबर पाटील, तानाजी पाटील,रत्नाप्पा घेवारे, नानासाहेब गायकवाड, रामदास कदम, विश्वनाथ देशमुख, माणिक बोळे, श्रीमंत कदम, गणेश ओझा, हेमंत पाटील, पंडीत कवडे यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व चेअरमन वैशाली देशमुख यांचे आभार मानून उसउत्पादकांनी सत्कार केला.
यावेळी व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सूडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने