अमृत महोत्सवी वर्षानिमित्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम

अमृत महोत्सवी वर्षानिमित्य मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम
औसा/ प्रतिनिधी- अमृत महोत्सवी वर्षानिमित्य तहसील कार्यालय औसा यांचे मार्फत सर्व कार्यालय प्रमुख सोबत शालेय विद्यार्थी व (एन.सी.सी) विधार्थी यांचेसह  अविनाश कोरडे उपविभागीय अधिकारी औसा- रेणापूर यांचे अध्यक्षतेखाली सत्यागृह ते स्वच्छतागृह या विषयावर चित्ररथासह तहसील कार्यालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात येवुन औसा येथील स्वातंत्र्य सैनिकाच्या वारस पत्नी ९. श्रीमती लक्ष्मीबाई बाबुअप्पा राजुरे. २. माणिकबाई हिरासिंग बायस. ३. चंद्रकला महादेव निरगुडे यांचा राहत्या घरी जावुन त्यांचा टोपी. पंचा, सुताची गुंडी, व रोपटे देवुन सत्कार करण्यात आला. औसा किल्ला या ऐतिहासीक वास्तूस भेट देवुन स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. नंतर खादी ग्रामदयोग वास्तूस भेट देण्यात येवून तेथील स्वामी रामानंद तीर्थ यांचे पुतळयास अभिवादन करण्यात आले. तदनंतर मुक्तेश्वर मंगल कार्यालयापर्यत रॅली नेण्यात आली. त्यानंतर मुक्तेश्वर मंगल कार्यालयात मा. आमदार श्री अभिमन्यु पवार साहेब यांचे प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी व वारस कुंटुंबियाचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्य तालुक्यातील विविध शाळेतील सांस्कृतीक कार्यक्रम व इतर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील प्रथम क्रमांक पटकावणा-या विधार्थ्याना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देण्यात आले तसेच सदरील स्पर्धा घेणा-या परिक्षकांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. सदरील कार्यक्रमांस श्री अविनाश कोरडे उपविभागीय अधिकारी, औसा रेणापूर, श्री रामदास इंगवले उपविभागीय पोलीस - अधिकारी औसा, श्री भरत सुर्यवंशी तहसीलदार औसा, श्री निलेश होनमोरे अपर तहसीलदार, श्री रेजीतवाड पोलीस निरिक्षक औसा, श्री युवराज म्हेत्रे गट विकास अधिकारी, पंचायत समिती औसा. रणदिवे मुख्याधिकारी नगर परिषद औसा, नायब तहसीलदार श्री सुरेश पाटील, श्री इंद्रजित गरड, श्री द.म. कांबळे, श्री लालासाहेब कांबळे विविध गावचे सरपंच व सर्व शाळा कॉलेजसचे शिक्षक व कर्मचारी हे उपस्थित होते. तसेच श्री कमलाकर सावंत यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामावर अभ्यासपुर्ण व्याख्यान दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने