पतंजली योग समितीच्या वतीने बीएसएफ प्रशिक्षणार्थींना केले रक्षाबंधन

 पतंजली योग समितीच्या वतीने बीएसएफ प्रशिक्षणार्थींना केले रक्षाबंधन 

लातूर/प्रतिनिधी-रक्षाबंधनाचा उत्सव वेगवेगळ्या कार्यक्रमाने साजरा केला जातो परंतु भारत स्वाभिमान अंतर्गत पतंजली महिला योग समिती जिल्हा लातूर यांच्या वतीने देशाच्या सीमारेषेवर आपल्या प्राणाची बाजी लावून देशवासीयांचे रक्षण करणार्‍या चाकूर येथील बीएसएफ प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांना रक्षाबंधन करून देश सेवा करणार्‍या वीर जवाना सोबत पतंजली महिला योग समितीच्या महिला भगिनींनी रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केला. तसेच वीर जवानांना लाडू वाटप केले. पतंजली महिला योग समितीच्या सौ.कलावती भातंब्रे,मीनाक्षीताई स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पतंजली महिला योग समितीच्या लातूर जिल्हा प्रभारी सुमन पवार, सौ महानंदा घारापुरे,चंद्रकला केंद्रे, कवीता झांबरे, राजशी साळी,डॉ. अंजली स्वामी, प्रभा मोतीपवळे, सुषमा सोनटक्के,संगीता मुरगे, लक्ष्मी काटे,संगीता सोनट क्के, अंबिका कोरे, जिजा माने, राधा सुरवसे, संगीता अस्वले, सौ.सुवर्णकार, वसुंधरा मुंडे इतर भगिनी व बीएसएफ प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कमांडर यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने