लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात सीपीसीआर आणि एसीआरएलएस या विषयावर कार्यशाळाचे आयोजन

लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात सीपीसीआर आणि एसीआरएलएस या विषयावर  कार्यशाळाचे आयोजन




लातूर-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि नेक्स्ट जनरेशन ग्रुप पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयांमध्ये सीपीसीआर व एसीआरएलएस या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे,या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून नेक्स्ट जनरेशन ग्रुपचे डॉ.मुनिंद्र सावंत आणि डॉ. अली बसेर यांनी तृतीय वर्ष ,शेवटचा वर्ष आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे,प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम,डॉ.धनश्री शिंदे हे उपस्थित होते.
     या शिबिराचे उद्देश म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये मानवाला अचानकपणे हार्ट अटॅक येऊ शकतो आणि त्याला प्राथमिक उपचार म्हणून सीपी आर दिला जातो म्हणजे ज्या व्यक्तीला श्वास गुदमरला आहे किंवा हृदयाची गती मंदावली आहे ती पूर्ववत होईपर्यंत छातीवर दाब दिला जातो यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सामान्य होण्यास मदत होते याशिवाय सीपीआर मध्ये रुग्णाला तोंडानेही श्वास दिला जातो सीपीआर देण्याची एक विशिष्ट पद्धत असते ती या शिबिरत द्राकश्राव्य माध्यमातून शिकविण्यात व सांगण्यात आले. या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने