रामनाथचे जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत घवघवीत यश

 रामनाथचे जिल्हास्तरीय शालेय ज्युदो  स्पर्धेत घवघवीत यश
 आलमला/प्रतिनिधी :- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथील विद्यार्थ्यांनी दि.26-09-2023 रोजी क्रीडा संकुल लातूर येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जुदो स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातील व संबंधित वजन गटात  कु. पुनम राठोड(40), कु. ज्योती जाधव(48), कु. इनामदार आयेशा(52 ), कु. पवार पूजा(63 ), जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर कु.आडे ममता ((57), राठोड अनिता (44 ), राठोड आदित्य(35 ), चव्हाण नितेश(51 ), राठोड रोशन(48), वजन गटात जिल्ह्यात द्वितीय आले आहेत, तसेच 14 वर्ष वयोगटांमध्ये कु. गीता राठोड(27),कु.आडे  ऋतिका(32),कु. कदम समृद्धी(36), पवार वैष्णवी(44), कु. चव्हाण काजल(45) ह्या जिल्ह्यात प्रथम आल्या आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री रंगनाथ अंबुलगे यांचे विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे सचिव श्री प्रभाकर कापसे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट  उमेश पाटील,  उपाध्यक्ष श्री शिवाजीराव आंबुलगे,  सहसचिव नंदकिशोर धाराशिवे, कोषाध्यक्ष चनबसप्पा निलंगेकर, व सर्व संचालक मंडळ यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पाटील,  पर्यवेक्षक श्री पी. सी.पाटील व श्री सचिन कोकाटे सर सर्व शिक्षक,  प्राध्यापक,  शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने