आलमला/ प्रतिनिधी -औसा तालुक्यातील आलमला येथील जि प प्रशाला शाळेच्या दुरुस्ती कामाचा उद्घाटन सोहळा दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कुंभार व किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला लातूर जिल्हा समग्र शिक्षाअभियान या योजनेतून या शाळेसाठी सात लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे . या निधीतून शाळेचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.या कार्यक्रमासाठी भाजप युवा कार्यकर्ते कमलेश निलंगेकर, शालेय समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील, उपाध्यक्ष विशाल वाघमारे ,सदस्य विरनाथ आंबुलगे, विजय कदम ,जावेद पटेल ,सुरेश दूधभाते, गणेश खांगले, अजित कोकाटे माजी प.स सदस्य दौलत वाघमारे ,माजी सरपंच गुंडाप्पा लांडगे रामेश्वर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून जिल्हा परिषदेच्या शाळा ही अत्याधुनिक होत आहेत याबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष शिवकुमार पाटील यांनी समाधान व्यक्त केले सर्वांच्या सहकार्यामुळे हे काम होत आहे. याचा मला आनंद आहे अशा आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमासाठी जि.प. मुख्याध्यापक वामन राठोड, केंद्रप्रमुख श्रीमती जयश्री खराबे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा