लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीचा देवता गणरायाची प्रतिष्ठापना


लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीचा देवता गणरायाची प्रतिष्ठापना

 मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लातूर येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल मध्ये बुद्धीची देवता

श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

यावेळी लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुल च्या चिमुकल्यांनी लेझीम, ढोल ताशांच्या गजरात, उत्साहात

गणरायाचे स्वागत केले. चिमुकल्यांच्या ‘‘गणपती बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’’ जयघोषाचा आवाज

शाळेच्या परिसरात घुमला. यावर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मंडळांच्या कमिटी मेंबरची निवड लकी ड्रॉ

पद्धतीने केली. त्यानुसार लॉर्ड श्रीकृष्ण बाल  गणेश  मंडळाचे अध्यक्ष - विहान भारतकुमार थडकर,

दीपराजसिंग विजयसिंग सुर्याबंशी, आरुष गजानन चाटे, उपाध्यक्ष - स्वरा राजकुमार शिंदे, अर्सलान

मोबिनपाशा शेख, स्वरा सचिन सोळंके, सचिव - अर्णव व्यंकटेश कुलकर्णी, समर्थ राजाराम नागरगोजे,

कोषाध्यक्ष - आरोही किशोर खोसे, शौर्य अंकुश जाधव, आयोजक – अनिरुद्ध सचिन क्षीरसागर, इशांत प्रमोद

कांबळे, प्रसिद्धी प्रमुख - श्रावणी गोविंद शेळके, आर्या अभिमन्यू वाघमारे यांची निवड करण्यात आली.

शाळेच्या परिसरात गणपती बप्पांचे आगमन झाल्यानंतर सर्व प्रथम शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम आणि

झांज पथकाने आपले प्रात्यक्षिक दाखवले या पथकाला शाळेच्या शिक्षिका अर्चना शिंदे, शाळेचे शिक्षक

दीपककुमार कांबळे यांनी मार्गदर्शन केले. गणपतीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला व मोठ्या जयघोषाने

बाप्पांचे स्वागत अतिशय हर्षोल्हासात केले. यावेळी श्रीकृष्ण लाटे, कविता लाटे, प्राचार्या दुर्गा

भताने,उपप्राचार्या रुपाली कुलकर्णी, शाळेचे समन्वक रौफ शेख व लॉर्ड श्रीकृष्ण बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष

दीपराजसिंग विजयसिंग सुर्याबंशी, आरुष गजानन चाटे यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीची पूजा व आरती

करण्यात आली. गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेने विविध

स्पर्धांचे आयोजन केले आहे.

यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष व मंत्र पुष्पांजली चे पठण करून बुद्धीची देवता लॉर्ड श्री

गणेशाचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कोकाटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी

करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने