युनिक फेस्टिव्हल 2023 चे आयोजन

युनिक फेस्टिव्हल 2023 चे आयोजन 
लातूर/शहरातील युनिक कॉम्प्युटर अँकॅडमी, शाहू चौक, लातूर तर्फे युनिक फेस्टिव्हल 2023 चे आयोजन करण्यात आले होते. यात अँकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानासोबत त्यांचा सर्वागीण विकास साधून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध अश्या स्पर्धांचे आयोजन या फेस्टिव्हलच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी  आरीफभाई सिद्दीकी, प्रमुख पाहुणे म्हणून  अभिजीत देशमुख,देवीदास काळे, प्रशांत घार, बालाजी मरे, इसरारजी सगरे,डॉ. दिपकजी दाडगे,सौ. डॉ. आस्मा शेख मॅडम, कु. मदिहा पटेल मॅडम, आदींची उपस्थिती होती.
या फेस्टिव्हलच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी त्यांना दैनंदिन जीवन जगत असताना कश्या पद्धतीने जीवन जगले पाहिजे यावर विशेष मोटीवेशनल स्पीच चे आयोजन करण्यात आले होते. या सत्रासाठी सोलापूरचे प्रसिद्ध मोटीवेशनल स्पिकर प्रा. आय. आय. मुजावर सर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारूकअली बेग सर, सोनाली पोपळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आस्मा मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकॅडमी चे समीर सर, अखिल सर, राजू सोनवणे, अहेमद शेख सर, प्रा. नासेर पठाण सर, सद्दाम शेख सर, मोहसीन तांबोळी सर, अजहर शेख सर, नंदिनी मॅम, अलिजा मॅम, सादिक पठाण सर, आकाश मरे, वाजीद शेख, शरफोद्दीन शेख ई. नी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने