मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

लातूर-मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सव व ज्येष्ठ नागरिक दिन या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी, लातूर यांचे सूचनेस अनुसरून लातूर शहर महानगरपालिकेमार्फत, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सहकार्याने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

याअंतर्गत मिरागी नेत्रालय, एम.आय.टी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय व नेत्रप्रतिष्ठान डी.एस. कराड डोळ्याचे रुग्णालय, एमआयडीसी हे तीन रुग्णालय तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

 यासाठी नुकतीच मा.आयुक्त श्री.बाबासाहेब मनोहरे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली व शस्त्रक्रिया शिबिराचे नियोजन करण्यात आले. बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक, विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरागी रुग्णालय खाजगी नेत्ररोग संघटनेचे प्रतिनिधी, रोटरी, लायन्स क्लबचे पदाधिकारी व मनपाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

 यांतर्गत मोतीबिंदू सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी मनपाच्या प्रा.ना.आ.केंद्र येथे दि.15 व 16 सप्टेंबर रोजी नेत्र रुग्णालयाच्या नेत्रचिकित्सा अधिकारी यांचेमार्फत प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीमध्ये मोतीबिंदू आजार आढळून आलेल्या रुग्णांची गणेशोत्सवानंतर दि.ऑक्टोबर पासून टप्प्या-टप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

 तरी मोतीबिंदू सदृष्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनीआपल्या नजीकच्या प्रा.ना.आ.केंद्र येथे दि.15 व 16 सप्टेंबर रोजी प्राथमिक तपासणी करून घ्यावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने