आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मारली बाजी

आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मारली बाजी 
देवणी/ प्रतिनिधी- वीर हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ भुसणी येथे शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज देवणी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात वयोगट 14 वर्षे, वजनगट 44 किलो मध्ये समर्थ सचिन सूर्यवंशी हा द्वितीय व वयोगट 14 वर्षे वजनगट 48 किलो मध्ये गणेश रघुनाथ गावलगडदे हा द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर नरसिंह विद्यालय गुरधाळ येथे शालेय तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वयोगट 19 वर्षे मुलींमध्ये कु. साक्षी बाबासाहेब कांबळे ही प्रथम, वयोगट 17 वर्षे मुलींमध्ये रोहिणी संभाजी कोनाळे ही प्रथम आणि वयोगट 14 वर्षे मुले मध्ये  कु. कुणाल कोनाळे व कु.परमेश्वर काळे यांनी प्रथम क्रमांक पटकावले. शाळेचे क्रीडा शिक्षक विक्रम गायकवाड यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव तालुक्यात नाहीतर जिल्हा पातळीवर लौकिक केली. या सर्व विद्यार्थ्यांचे जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणी चे संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर व संस्था सचिव गजानन भोपणीकर यांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.शाळेच्या वतीने प्राचार्य राहुल बालुरे या सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार केले व तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांन्ना शुभेच्छा दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने