रेणुकादेवी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत यश

 रेणुकादेवी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत यश


 लातूर - जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील वसंतनगर येथील रेणुकादेवी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडत आहेत. यात रेणुकादेवी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सोनाली बचकने हिने उंच उडी स्पर्धेत, पाचशे मीटर चालणे स्पर्धेत विश्‍वजीत कातपुरे, जिल्हास्तरीय सायकलींग स्पर्धेत नरेंद्र सोमवंशी व धावण्याच्या ४-१०० रिले स्पर्धे शाळेचा संघ सर्वप्रथम ठरला आहे. बुध्दिबळ स्पर्धेत स्वप्नील वाघमारे हा विद्यार्थी अजिंक्य ठरला असून त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या विजयी खेळाडूंचे शाळेच्यावतीने कौतुक करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव भिकाणे, सचिव सचिन भिकाणे, सहसचिव डॉ. शशीकिरण भिकाणे, मुख्याध्यापक मारुती नामपल्ले, प्राचार्या अनिता गोजमगुंडे, पर्यवेक्षक शिवाजी बेंबडे, गजानन काळे यांच्यासह या खेळाडूंचे मार्गदर्शक किसन मेकले व लतिफ शेख तसेच सर्व शिक्षक - शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने