योगिता सावंत तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम

योगिता सावंत तालुकास्तरीय योगा स्पर्धेत प्रथम 
औसा/प्रतिनिधी- क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र पुणे व लातुर जिल्हा क्रिडा कार्यालय व्दारा आयोजित औसा,तालुका स्तरीय शालेय योगासने स्पर्धेत श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला येथे घेण्यात आलेल्या योगासने स्पर्धेत श्री मुक्तेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनीं कु.सावंत योगीता नेताजी हीने मुलीतील -17 वर्षे वयोगटातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.यशाबद्दल विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष,सचिव सर्व संचालक मंडळ,शाळेचे मुख्याध्यापक जलसकरे, क्रीडा व योगा विभाग प्रमुख तथा मार्गदर्शक साकोळे, सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने