स्वस्त धान्य दुकान मध्ये गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा देवणी खुर्द येथे वाटपास प्रारंभ

 स्वस्त धान्य दुकान मध्ये गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा देवणी खुर्द येथे वाटपास प्रारंभ
देवणी/प्रतिनिधी-राज्य शासनाच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्त आनंदाच्या शिधा वाटपास प्रारंभ, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था देवणी खुर्द स्वस्त धान्य दुकान देवणी खुर्दचे चेअरमन रतन गरड यांनी आनंदाचा शिधा वाटप करताना प्रारंभ करते वेळी देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिलीप मजगे, राजकुमार बिरादार संचालक, वहाबखाँ पटेल, किसनराव पाटील संचालक,सिताराम पाटील, किरण कांबळे, लक्ष्मण रणदिवे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, विश्वनाथ गिरी, लक्ष्मीबाई रणदिवे, फुलाबाई कांबळे, पचुबाई पिनाटे, राणी सुर्यवंशी, सुरेश रणदिवे, आदिची उपस्थित होते, तसेच लाभार्थीना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले,तसेच शिधा जिन्नस १०० रुपये मध्ये कमी दरात याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये एक किलो रवा,एक किलो साखर,एक किलो चणाडाळ, व एक पाम तेल पाकीट मिळणार लाभार्थींना देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने