रसिका महाविद्यालयास मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अभ्यासक्रमाची मान्यता

रसिका महाविद्यालयास मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अभ्यासक्रमाची मान्यता
देवणी/प्रतिनिधी-कै. रसिका महाविद्यालय, देवणी येथे बी.एस्सी. पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मान्यता दिली आहे. यापूर्वी महाविद्यालयात मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी. ए., बी.कॉम., पत्रकारिता व एम.कॉम. हे अभ्यासक्रम सुरू आहेत. चालू शैक्षणिक वर्षामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने बी.एस्सी. PCM व CBZ या ग्रुपचे अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो, तसेच बी.एस्सी. या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी मूळ कागदपत्रांची आवश्यकता नसून झेरॉक्स कागदपत्र आधारे प्रवेश घेता येतो. या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. असे आवाहन संस्था सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, केंद्र संयोजक प्रा. डॉ. प्रशांत भंडे, केंद्र सहायक प्रा.डॉ. गोपाल सोमाणी, समन्वयक प्रा. आमिर पठाण यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने