लातूर काॅलेज आॅफ एम फार्मसी कोळसुरे जयश्री आणि कट्टा अपूर्वा विद्यापिठात प्रथम

लातूर काॅलेज आॅफ एम फार्मसी कोळसुरे जयश्री आणि कट्टा अपूर्वा विद्यापिठात प्रथम  
औसा (प्रतिनिधी ) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड अंतर्गत घेण्यात येणाऱ्या एम  फार्मसी  उन्हाळी परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला . श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ एम  फार्मसी हासेगाव महाविद्यालयाचा १०० % निकाल लागला   रेग्युलेटरी अफेर्स या विषयात द्वितीय  वर्षात  कोळसुरे जयश्री श्रीमंत  आणि कट्टा अपूर्वा वेंकटेश यांनी प्रत्यकी ८५. ४२ % गुण घेऊन नांदेड  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठात  प्रथम येण्याचा मान  पटकावला तर द्वितीय  पाटील घोटे माणशी तर तृतीय क्रमांकावर बावगे महेश विश्वनाथ आहे . .एम फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री द्वितीय वर्षातील शिकत असलेली  कु. कांबळे अंजली ८३. ४० % हि महाविद्यालयात प्रथम तर शिंदे स्मरणिका ८२. ४९ % घेऊन द्वितीय अली आहे तसेच सुरवसे अस्मिता ८०. ९५ % गुण घेऊन महाविद्यालयात तृतीय अली आहे 
                महाविद्यालयाचा निकाल १०० % लागला असून   एम  फार्मसी रेग्युलेटरी अफेर्स  एम  फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री या दोन विषयातील ३० विध्यार्थी पैकी २६ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह आले आहेत . 
              याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,प्राचार्य श्यामलीला बावगे (जेवळे)  लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी , लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  आप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने