राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक मध्ये पालक मेळावा संपन्न

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक मध्ये पालक मेळावा संपन्न 
     औसा- हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांशी संवाद साधण्याकरीता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 
      सर्वप्रथम सरस्वती प्रतिमेचे पूजन करून मागील वर्षी महाविद्यालयातून प्रथम द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे संचालक नंदकिशोर बावगे हासेगाव फार्मसीच्या प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे-जेवळे व प्राचार्य मेतगे एस पी उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संस्थेबद्दल सविस्तर माहिती प्राचार्य श्री मेदगे एस पी यांनी सांगितली. संचालक नंदकिशोर बावगे सरांनी प्रतिकूल परिस्थितीत यश कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन करून कठोर परिश्रमाकरिता पालकांनीही विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे सरांनी नियमित अभ्यास करून नामांकित कंपनीत नोकरी कशी मिळवावी तसेच महाविद्यालयात नवनवीन प्रयोग करून बुद्धीचा विकास कसा करावा याबद्दल सखोल उत्साह पूर्ण मार्गदर्शन केले. शेवटी संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे सरांनी किशोर वयातील मुला मुलींना कसे हाताळायचे याबद्दल माहिती दिली, तसेच मुला मुलींच्या मानसिक, शैक्षणिक बौद्धिक वाढीसाठी वेळेचे नियोजन, चांगले मित्र मैत्रीण, चांगल्या सवयी, संस्कार, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय मूल्य वृंर्ध्दिंगत करण्यासाठी पालकांनी बारीक लक्ष ठेवावे असे आवाहन केले.
    सुत्रसंचालन प्रा. ताडके के डी यांनी तर आभार प्रा पाटील डी पी यांनी मानले. यावेळी प्रा पंचाक्षरी एस एम , प्रा गायकवाड एस एन, प्रा कल्याणकर एस ए, प्रा पठाण एस ए, प्रा सांगवे आर एस, प्रा राजपुत एच बी, पाटील ए आर, किसवे एस आर , शिंदे ए व्ही , माने एस एस, ग्रंथपाल मनदीप सवाई व विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने