माऊली विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा

माऊली विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा
 लातूर :  शहरातील अंबाजोगाई रोडवरील माऊली बालक मंदिर, माऊली विद्यार्थी विकास केंद्र, व माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कूल, लातूर च्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमी व दहीहंडीचा सुंदर कार्यक्रम विद्यालयात आयोजित . 
  या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रिष्ण कि लीला या गीतावर बहारदार असे नृत्य सादर केले.या नृत्यांमध्ये वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन जातानाचा क्षण ,कालिया मर्दन  नृत्य ,गोवर्धन पर्वत  लीला ,रासलीला अशा विविध प्रसंगांचं सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमा पूजनाने तर समारोप श्रीकृष्णाच्या आरतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव श्री गंगाधर आरडले सर यांनी केले. सूत्रसंचालन भाग्यश्री उबाळे यांनी तर आभार विद्यालयाच्या प्राचार्या सौ.कविता आरडले मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमात रंगभूमीचे संचालक व कोरीओग्राफर श्री मयूर राजापुरे यांचा सत्कार संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. तानाजी बेवनाळे पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या उपप्राचार्या काळे मॅडम, परिसरातील नागरिक ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक श्री गोपाळ करडिले सर्व शिक्षक वृंद व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने