जलशुद्धीकरण केंद्रासाठी २५ लाखांचा निधी मंजूर जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे यांनी दिली माहिती

जलशुद्धीकरण केंद्रासाठी २५ लाखांचा निधी मंजूर जळकोटचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे यांनी दिली माहिती
जळकोट : प्रतिनिधी- शहरातील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा.यासाठी जळकोट येथील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ जलशुद्धीकरण केंद्रासाठी राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून २५ लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती जळकोट नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मन्मथ किडे यांनी दिली.जळकोट शहराला पाणीपुरवठा करणारी जी पाण्याची टाकी आहे त्याच्याजवळ जलशुद्धीकरण केंद्र आहे परंतु हे जलशुध्दीकरण केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना तलावात जसे पाणी आहे तसेच पाणी नळाद्वारे मिळत आहे . त्यामुळे जळकोटचे जलशुद्धीकरण केंद्र तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी जळकोट शहरातील नागरिकांनी केली होती. जळकोट शहरातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे. यामुळेच जळकोट येथे जलशुद्धीकरण केंद्र निर्माण करण्यात आले होते. तलावातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात व ते पुन्हा पाण्याच्या टाकीत यानंतर ते नळाद्वारे नागरिकांना पूर्वी मिळत असे यामुळे पाण्यातील जी काही घाण आहे किवा अन्य विद्राव्य घटक बाजूला काढले जात होते आणि नागरिकांना स्वच्छ, शुद्ध पाणी मिळत होते परंतु गत अनेक वर्षांपासून हे जलशुध्दीकरण केंद्र बंद पडले होते.
येत होते. तलावांमध्ये विहीर आहे परंतु कधीकधी तलाव तुडुंब भरले तर विहिरीतही तलावातील पाणीसाठा जमा होत होता. या बातमीची दखल घेऊन नगरपंचायतीने जळकोट येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र व्हावे यासाठी पाठपुरावा के ला व यास यश मिळाले. निधी मंजूर झाल्याने लवकरच जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करण्यात येणार आहे व येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जळकोटवाशियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल अशी माहिती उपनगराध्यक्ष मन्मथ ज्यावेळी तलावातील पाणी कमी झाले अशावेळी पाण्याला प्रचंड अशी दुर्गंधी येत होती तसेच पाण्यामध्ये प्रचंड असे शैवाळ असल्यामुळे पाणीही अनेक वेळा हिरवट रंगाचे किडे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने