औसा/प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली, उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांच्या उपस्थितीत शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे संपन्न झाली.
यावेळी उपसभापती संतोष सोमवंशी यांनी महाराष्ट्रातील बाजार समित्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असे मत व्यक्त केले यापुढे म्हणाले की, पणन सुधारणेमुळे होणाऱ्या संपूर्ण शेतीमालाच्या नियमनमुक्ती नंतर बाजार समित्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत कमी होऊन बाजार समित्यांचे उत्पन्न घटणार आहे परिणामी बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे बाजार समित्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध शिफारशी शासनाकडे करणार असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले.
यावेळी बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाहटा,,उपसभापती संतोष सोमवंशी,माजी आमदार केशवराज मानकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुंबई बाजार समिती सभापती अशोकराव डक, पोपटराव सोनवणे, दामोदर नवपुते, आनंदराव जगताप, संजय कामनापुरे ,दिनेश चोखारे, बाबाराव पाटील ,पंढरीनाथ थोरे, संदीप काळे, सौ रंजना कांडेलकर, कार्यकारी संचालक किशोर कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्रातील बाजार समितीचे सभापती ,उपसभापती, संचालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनेक प्रश्नांबाबत ठराव पारित केले अंत्यत खेळीमेळीच्या वातावरणात संघाची 54 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
टिप्पणी पोस्ट करा