छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल आ.पवार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी-मनसेची मागणी 

औसा/प्रतिनिधी- आ. अभिमन्यू पवार यांनी 31 जूलै रोजी मौजे कासारसिरसी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आ. अभिमन्यू पवार यांनी शिवरायांच्या खांद्यावर हात ठेवून भाषण केले.हा प्रकार म्हणजे छत्रपती शिवराय यांचा अवमान आहे.या घटनेमुळे जनतेच्या भावना दुखावल्या असून जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.त्यामुळे सदरील ठिकाणी आ. अभिमन्यू पवार यांनी शिवरायांना नतमस्तक होऊन माफी मागावी या मागणीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कासारसिरसी येथील पोलिस स्टेशन समोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढिय्या आंदोलन करुन निलंगा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, विधानसभा संघटक महेश बनसोडे, जिल्हा सचिव धनराज गिरी, तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, शहराध्यक्ष प्रवीण कठारे,शहर सचिव अमर थोरात ,पंकज पांचाळ,आदि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने