शिवलिंग नागापुरे रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार (नेशन बिल्डर अवॉर्ड) ने सन्मानित

शिवलिंग नागापुरे रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार (नेशन बिल्डर अवॉर्ड) ने सन्मानित
औसा/प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा येथील माध्यमिक विज्ञान शिक्षक श्री शिवलिंग उमाकांत नागापुरे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेवून रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या वतीने 2023-24 चा रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार (नेशन बिल्डर अवॉर्ड) देवून गौरविण्यात आले. दिनांक 24 सप्टेंबर रोजी लातूर येथील स्टीम एज्युकेशन सेंटर येथे रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे साहेब यांच्या उपस्थितीत रोटरीचे माजी प्रांतपाल रो. हरिप्रसाद सोमाणी यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, सन्मान पत्र, स्मृतीचिन्ह देवून श्री शिवलिंग नागापुरे यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरीचे प्रोजेक्ट चेअरमन रो.जगदीश कुलकर्णी, लिटरसी डायरेक्टर रो. प्रा.ओमप्रकाश झुरूळे, रोटरीचे अध्यक्ष रो. रविंद्र बनकर, रोटरीचे सचिव रो डॉ. अविनाश भोसले, रो. किशोर दाताळ यांची उपस्थिती होती. शिवलिंग नागापुरे यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्री शिवलिंग नागापुरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रशासकिय अधिकारी, शिक्षक मित्र परीवार यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने