आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या हस्ते विविध गावात 90 कोटी रूपयाच्या विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन

आ. संभाजीराव पाटील निलंगेकरांच्या हस्ते  विविध गावात 90 कोटी रूपयाच्या विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन
निलंगा /प्रतिनीधी- तालूक्यातील विविध गावामध्ये मा. मंञी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते रविवारी कोट्यावधी रूपयाचे विकास कामाचे लोकार्पन व उद्घाटन करण्यात आले दापका, गौर, सिंधीजवळगा, तुपडी, बसपूर , शेंद , माचरटवाडी , शेडोळ , कलांडी , मुगाव , डांगेवाडी , उमरगा हा. इ. गावामध्ये झालेल्या कामाचे लोकार्पन व नविन कामाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव , तहसिलदार उषाकिरण श्रंगारे , भाजप अध्यक्ष कुमोद लोभे, प्रा. शेषेराव ममाळे , दगडू सोळूंके गुंडेराव जाधव अशोक शिंदे  उपस्थित होते.
आ. निलंगेकरांनी जल साक्षरता रॕली च्या नंतर मतदार संघातील गावामध्ये विकास कामाचे लोकार्पन व नविन कामाचे उद्घाटन करण्यासाठी गावांना भेटी दिल्या .
वरील गावांना जनसुविधा, मुलभूत सुविधा , दलीत वस्ती, जलजीवन मिशन, स्थानिक आमदार फंड तसेच प्रधानमंञी सडक योजने अंतर्गत अनेक गावांना निधी मिळवून दिला आहे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आ. निलंगेकर या गावी आले होते.
तालूक्यातील दापका येथे 16 कोटी 25 लाख तुपडी 80 लाख, माचरटवाडी 94 लाख , कलांडी 68 लाख , शेडोळ 88 लाख रूपये निधी या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत मिळाला असल्याने या ठिकाणची पाणी पुरवठ्याची कायम स्वरूपी सोय होणार आहे या ठिकाणच्या कामाचे आ. निलंगेकरांनी उद्घाटन केले.
तसेच माचरटवाडी पाटी ते गाव या रस्यासाठी प्रधानमंञी सडक योजनेतून 2 कोटी तसेच शेंद ते मुगाव पाणंद रस्यासाठी 48 लाख व शेडोळ येथे रस्यासाठी 2 कोटी रूपये निधी दिला आहे त्यामुळे अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेले रस्ते आता तयार होणार असून या होणाऱ्या रस्त्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त होत आहे .
15 आॕक्टोबर घटस्थापनेच्या दिवशी आ. निलंगेकरांनी या गावांना भेटी दिल्या वरील सर्वच गावामध्ये अंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्ते , पेव्हर ब्लाॕक , अंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईन , विद्युतीकरण, या साठी आ. निलंगेकरांनी मोठा निधी दिल्याने या गावात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
निलंगा तालूक्यातील दापका, गौर, सिंधीजवळगा, तुपडी, बसपूर, शेंद, माचरटवाडी, शेडोळ, कलांडी, मुगांव , डांगेवाडी , उमरगा हा या गावामध्ये अंतर्गत रस्ते, पापी पुरवठा , आमदार फंड दलीत वस्ती, मुलभूत सुविधा , प्रधानमंञी सडक योजना, अशा अनैक योजनामधून वरील गावांना सर्वात मिळून 90 कोटीचा निधी मिळाला असून त्याचे उद्घाटन व लोकार्पन आ. निलंगेकरांनी केले
मतदार संघातील कुठल्याही गावाला विकास निधीची कमतरता भासणार नाही तसेच येणाऱ्या काळात पाणी टंचाई भेडसावणार असून त्याचे नियोजन आत्ता पासून कराव्या अशा सुचना करून शेतकऱ्यांना या वर्षीचा पीक विमा मिळणारच असे आ. निलंगेकरांनी यांनी सांगितले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने