प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीने जेष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
लातूर/प्रतिनिधी-प्रभुराज प्रतिष्ठान, लातूरच्या वतीनेनाना नानी उद्यान (पार्क) परिरात जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले.
आजच्या काळात पैसाच सर्वत्र आहे असे आजच्या नवी पिढीचा गैरसमज झाले असे वाटते कारण हल्ली च्या काळात वरिष्ठ आई वडील जेष्ठ मंडळी यांची गैरसोय व यांना होणारा त्रास, छळ याचा प्रमाण मोठ्या संख्येने वाढु लागला आहे.याचे कारण जुन्या लोंकाची सहनशक्ती, वागणूक, शिकवण व संस्कार याचा आभाव होत असल्याने आई वडिलांशी व सासू सासरे यांचाशी कसे प्रेमाने वागावे हे कमी पडत आहे.वृद्धपणा च्या वयात स्मरण शक्ती कमी होत जातं असल्याने स्वभावात चिडचिड पणा अंगावर जाऊन बोलने रागाने बोलणे वारंवार विसरणे असे अनेक प्रकार वृद्धवयात होतात याचा विचार करून तरुण मंडळींनी त्यांच्या स्वभावात समाविष्ठ होऊन यांची भावना समजून त्या दूर कसे करता येईल हेतर तरुण मंडळींनी समजून घेतले तर जेष्ठ नागरिक कधीच दुःखी होणार नाही त्याची होनारी पिळवणूक व छळ कमी होईल. हे तर सर्व सफल यशस्वी झाले तर कश्याला वृद्धआश्रमाची गरज भासेल आणि कश्याला वृद्धआश्रम तयार होतील.हे सफल करण्यासारिता सर्वांनी आईवडिलांचे सासू सासऱ्याचे आदर केले पाहिजे त्याची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. आई वडिलांनी ही मुलांना प्रेमाने बोलणे व वागणूक दिली पाहिजे. महत्वाचं संबंध तो म्हणजे सासू आणि सून यांनी ही सासू नी सुनेसोबत मुलींसारखे व सुनेने सासू सोबत आई सारखे संबंध व वर्तणूक द्याबे तिचा आदर करावा कांही चुकले असेलतर पदरात घेऊन संसार पुढे असे आनंदानी चालेल यावर लक्ष द्यावे. चला मग जेष्ठाची सेवा करूया.... त्याचा सन्मान करूया...
यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे अँड.अजय कलशेट्टी,जेष्ठ अँड.श्रीकांत उडगे,जेष्ठ नागरिक लिंबनप्पा दाणे, एम. एम. पाटील,वाय. एस. मश्याक, प्रफुल म्हेत्रे, जेष्ठ कवी डॉ.संजय जमदाडे, ओमप्रकाश सारडा,रक्तदाते पारस चापसी,देविदास भोसले,विलास भुमकर,सचिन गोलावार,शिरीष माळी,महेश बावगे,दत्ता ढगे, हुसेन पठाण,अशोक पंचाक्षरी,सुरेश भुतडा,महालिंग सैदापुरे,नंदकुमार बनाळे, सोमनाथ खुदासे, डॉ. श्रीराम कोळेकर,शिवा धुळे,दीपक जगताप, शंकर कदम, सतीश लाहोटी, नंदकुमार अंकलकोटे, राजाभाऊ उपासे, डॉ.जेष्ठ कवी संजय जमादाडे,,संजय बागडे,शंकर कामले,सुनील कोटलवार, कुंचमवाड, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने