मनसे जनहित विधी सेवा व प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने नाना नानी उद्यान बचावासाठी स्वाक्षरी मोहीम

मनसे जनहित विधी सेवा व प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने नाना नानी उद्यान बचावासाठी स्वाक्षरी मोहीम
लातूर- कर्मयोगी मा. लोकनेते विलासरावजी दगडोजी देशमुख (नाना नानी) पार्क भाडे तत्वावर देण्यात आलेला परिसर रद्द करावे तसेच खाजगी करणाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम द्वारे नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला......
  मा. विलासरावजी दगडोजीराव देशमुख (नाना नानी )पार्क हे लातूरशहरील मुख्य ठिकाणी असल्याने तेथे नागरिकांना व जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी ही संकल्पना निर्माण केली. याचा लाभ लातुर शहरांतील अनेक नागरिक घेत होते.जेष्ठ नागरिकांना हे उद्यान आपलेसे वाटू लागले त्यांचा हक्काचं ठिकाण होते. कांही काळानंतर त्याचे एका कंपनीला खाजगी तत्वावर देण्याचे ठरले असता त्याबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन व आंदोलन मार्फत विरोध दर्शविला, पण मनपा लातूरने आपला मनमानी कराभार चालू ठेऊन नागरिकांच्या मागणीला दुर्लक्षित केले. यामुळे उद्यानामध्ये अनेक अडचणी येऊ लागल्या जसे की फिरण्यासाठी अपुरे ग्रॉऊंन्ड,जेष्ठ नागरिकांना विसावा घेण्यासाठी अपुरी जागा, जेष्ठ महिला नागरिकांना बसण्याकरिता जागा नसणे, स्वच्छतागृह दुर्गंधी अवस्थेत व तेथे पाण्याची व्यवस्था नसणे, पूर्ण परिसर अस्वच्छता असणे.असे अनेक प्रश्नाबाबत पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. या सर्व अडचणी खाजगी कंपनी व मनपा यांच्या समन्वय नसल्याने नागरिकांना सोसावे लागत आहे. या मनमानी केलेल्या खाजगी करणास नागरिकांचा पूर्ण विरोध आहे.खाजगीकरण करून भाडे तत्वावर देण्यात आलेल्या कंपनीचा फायदा नागरिकांना व पालिका प्रशासनाला होत नसून खाजगी कंपनी त्वरित नाना नानी पार्क येथून हलवून मनपा प्रशासनाने स्वतःच्या ताब्यात घ्यावे आणि लातूरतील सर्व नागरिकांना लहानमुलांना मोफत सुरु करावे अशी स्वाक्षरी मोहिमेमार्फत मनपा आयुक्ताना देण्यात येणार आहे. तरी यांची दखल घेऊन आयुक्त साहेबानी भाडे तत्वावर दिलेले खाजगीकण रद्द करावे आणि सर्व नागरिकांना न्याय द्यावे अशी विनंती करण्यात येत असून 
यावर प्रभुराज प्रतिष्ठानचे अद्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,ज्येष्ठ कवी सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय जमदाडे, विक्रम वीर रक्तदाते पारस सेठ चापसी, अँड. शिरीष धहिवाल,हेमंत वडणे, डॉ. श्रीराम कोळेकर,वाय. एस. मश्याक, संजय बागडे,विलास,भुमकर युवराज बेल्लूरे, नंदा हमीने,आयोद्या इंगळे,प्रफुल म्हेत्रे,सचिन गोलावार, प्रकाश साठे, डॉ.राजकुमार तोष्णनिवाल,हुसेन पठाण,शिरीष माळी, सतीश तिवारी,अशोक पंचाक्षरी,सोमनाथ खुदासे,गोविंद कुंचमवाड,नंदकुमार बनाळे, सुनील कोटलवार,मोतीराम कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने