पत्रकारावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखलकेल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी

पत्रकारावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल
केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

लातूर: शिरूर अनंतपाळ येथील पत्रकारावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याकडे शनिवारी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे, १९ आक्टोबर रोजी शिरुर अनंतपाळ येथील दै. तरुण भारतचे पत्रकार दयानंद बाबुराव कुंभार यांनी ' एन ए न करता ग्रामपंचायतीला 22 प्लॉटची नोंद' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्याचा राग मनात धरून मंगेश पाटील व त्यांच्या साथीदारांनी कुंभार यांना बेदम मारहाण केली असता कुंभार यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात ऑनलाईन तक्रार केली. परंतु संबंधितांवर गुन्हा न दाखल करता पोलिसांनी अपसात प्रकरण मिटवू, आपली तकार मागे घ्या, असे सांगून कुंभार यांना ठाण्यात बोलावून घेतले. त्यांनतर कुंभार यांच्यावरच ॲट्रॉसिटीश अन्य कलमाद्वारे खोटा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी स्विकारले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे, उपाध्यक्ष अफसर कारभारी, संघटक सुधाकर फुले, सचिव अशोक हाणवते, शहराध्यक्ष महादेव डोंबे, खय्युम शेख, अरुण कांबळे, हारुण मोमिन, वाल्मिकी केंद्रे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने