हासेगाव फार्मसीत महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी

हासेगाव फार्मसीत महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी 
                 औसा (प्रतिनिधी ) भारत निवडणूक आयोग मा. मुख्य निवडणूक अधिकारी , महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने युवा मतदार नोंदणी २०२३ विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले .तलाठी सोमवंशी बी व्ही, श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, डॉ. श्यामलीला जेवळे (बावगे) प्राचार्य संतोष मेदगे, हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.  
       डॉ श्यामलीला बी बावगे प्राचार्य लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव,प्रा.डॉ दशरथ भिसे नोडल अधिकारी , मतदान नोंदणी अभियान , संतोष मेदगे प्राचार्य राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव या कार्यक्रमाचे संयोजक आहेत . 
     
          महाविद्यालयामध्ये तलाठी सोमवंशी बी व्ही यांनी मतदान नोंदणी विशेष शिबीरात मतदान नोंदणी कशी करावी , मतदान यादीतून नाव कशे कमी करावे , नाव दुरुस्ती ,पत्ता बदलणे कशे करावे अनेक मतदानाचे महत्व सांगून युवा मतदारांनी नोंदणी करून जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान केले . त्याच बरोबर महाविद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करावे आणि निवडणूक आयोगाकडून उत्तीर्ण विध्यार्थ्यांना प्रस्तुती प्रमाणपत्र देण्याचे अश्वशान दिले. 
       
                 .लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर , सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने