देवणी खुर्द येथे युवक लक्ष्य गटाचे प्रशिक्षण संपन्न

देवणी खुर्द येथे युवक लक्ष्य गटाचे प्रशिक्षण संपन्न 
देवणी - युरोपियन युनियन व स्विसएड् (पुणे) यांच्या सहकार्याने ग्रामीण महिला विकास संस्था, देवणी च्या वतीने देवणी तालुक्यातील २० गावामध्ये युवक गटांचे  प्रशिक्षण घेण्यात येत आहे. मानवी अधिकार, लिंग आधारित भेदभाव, कौटुंबिक हिंसा या विषय जनजागृती व्हावी या उद्देशाने अशा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. युवक लक्ष्य गटाचे याचाच एक भाग म्हणून विस गावात युवक गट सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहे  दि, २/१०/२०२३ रोजी घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये पुरुषा  बरोबर  चार भिंतीच्या आतील महिला लिंगभाव विषमता, विषमतेची कारणे, परिणाम, श्रम विभागणी, मर्दानगी संकल्पना, या विषयावर प्रशिक्षण घेण्यात आले, या मध्ये व्हिडिओ, पि.पि.टी. द्वारे प्रशिक्षण पुरुषांना देण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये बालविवाह, हुंडा प्रथा, मुलींचे शिक्षण या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. 
तसेच हे प्रशिक्षण देवणी तालुक्यातील 20 गावामध्ये घेण्यात येत आहे. आपण सक्षम बनले पाहिजे समाजात समानता नांदली पाहिजे, प्रत्येक महिला व  मुलीस समाजामध्ये सन्मानाने जगता आले पाहिजे असे मत यावेळी कुशावर्ता  बेळे यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी  सबनिस गिरीश, कृष्णा इंगोले, विकास बिरादार, नागनाथ सुर्यवंशी व प्रेरक, प्रेरिका यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने