सुधीर साबणे यांना गुरुवर्य पुरस्कार २०२३ ने सन्मानित

सुधीर साबणे यांना गुरुवर्य पुरस्कार २०२३ ने सन्मानित
देवणी/प्रतिनिधी: आज दिनांक २ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा गांधी जयंती व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर यांच्या वतीने आयोजित *गुरुवर्य पुरस्कार  २०२३ गौरव सोहळ्यामध्ये सरस्वती माध्यमिक विद्यालय होनाळी, ता. देवणी येथील श्री सुधीर साबणे यांना मा. ना. संजय बनसोडे कॅबिनेट मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे महाराष्ट्र राज्य , मा. ना. संजय राठोड कॅबिनेट मंत्री, मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य , मा. राजेश्वर निटुरे मा. नगराध्यक्ष तथा सरचिटणीस प्रदेश काँग्रेस ,मा. राहुल केंद्रे माजी अध्यक्ष जि. प. लातूर , श्री भगवानराव पाटील तळेगावकर (चेअरमन भाऊसाहेब पाटील बँक ) यांच्या हस्ते उदगीर येथील बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कुल जी.एस. पी. एम.कॅम्पस येथे देण्यात आले. साबणे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल  सरस्वती ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव श्री उत्तमराव कारभारी, सरस्वती माध्यमिक विद्यालय होनाळी चे मुख्याध्यापक श्री माधव काकनाळे, सुभाष बिराजदार, एस. एम. पाटील, धोंडिबा बिरादार, मारोती बिरादार, श्रीनिवास कदम, स्वाती कारभारी, गंगाधर बिरादार, राजकुमार देशमुख, दीपक इंद्राळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, विध्यार्थी यांच्या कडून अभिनंदन होत आहे.श्री सुधीर साबणे यांना गुरूवर्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बध्दल श्री भोगेश्वर विद्यालय तळेगाव भो. चे मुख्याध्यापक सुनील क्षीरसागर आणि सर्व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी व देवणी तालुक्यातील सर्व स्तरावरुन पुढारी,कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांच्या वतीने सरांचे कौतुक होत आहे,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने