रोटरी क्लब लातूर मेट्रो तर्फे रामनाथ विद्यालयास आरो प्लांट भेट

रोटरी क्लब लातूर मेट्रो तर्फे रामनाथ विद्यालयास आरो प्लांट भेट
 आलमला/प्रतिनिधी-आलमला येथील श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयास रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोच्या  वतीने दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पिण्याच्या साठी आरो प्लांट भेट देण्यात आला. रोटरी इंटरनॅशनल एम्फोसिस अंतर्गत शाळेत नेतृत्व विकास, आर वाय एल ए ,घेण्यासाठी शाळेने रोटरी क्लब ला परवानगी दिली होती. मुलांच्या मध्ये जिज्ञासा ,आत्मविश्वास ,आपले निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी  आठवी ते बारावी च्या वर्गातील मुलांनी या नेतृत्व विकास कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोने यांना दिवसभर वेगवेगळ्या गटांमध्ये बसून योग्य असे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास प्रबळ सुदृढ समाजासाठी नेतृत्व गुण विद्यार्थी जीवनापासूनच मुलांच्या मध्ये निर्माण व्हावा या हेतूने रोटरी क्लब ने एक उत्कृष्ट कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन मुलांना प्रोत्साहित केले तसेच त्यांनी विद्यालयातील सर्वच मुलांची नेत्र तपासणी केली, यानंतर  रामनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे अध्यक्ष रविकिरण चव्हाण ,सचिव विष्णू कोल्हे, रोटरी क्लबचे सदस्य डॉ. जयशंकर बेरूळे, श्री हरिश्चंद्र पाटील, श्री संतोष कासले ,श्री अमित पुरूबुज , नानासाहेब आगवाने, नागनाथ आगवाने माजी अध्यक्ष यांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव प्रभाकर कापसे यांनी शाल श्रीफळ देऊन सर्व रोटरी क्लब ऑफ मेट्रो लातूरच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला व आपले मनोगत मांडले. याप्रसंगी रो.रविकिरण चव्हाण,डॉ. जयशंकर बेरुळे  यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मु.अ. सौ.अनिता पाटील, संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पर्यवेक्षक पी.सी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन भास्कर सूर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने