जिल्हयात औसा तालुक्यातील "धानोरा" हे पहिले आकडामुक्त गाव घोषित

जिल्हयात औसा तालुक्यातील "धानोरा" हे पहिले आकडामुक्त गाव घोषित
औसा/प्रतिनिधी-तालुक्यातील धानोरा गांव हे विजचोरिमुक्त झाले असुन आकडामुक्त गांव घोषीत करण्यात आले. सदरील धानोरा हे गांव निलंगा विभागातील पहिले आकडामुक्त गांव म्हणुन महावितरण कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी घोषीत केले. यावेळी महावितरण च्या वतीने गावचे सरपंच सुरेश मुसळे, उपसरपंच नागेश कोळपे व वरिष्ठ तंत्रज्ञ याहयाखान पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोषभाऊ सोमवंशी हे होते. महाराष्ट्रात पंढरपूर नंतर दोन चातुर्मास संपन्न करणारे धानोरा हे एकमेव गांव आहे. सांप्रदायीक गांव असल्यामुळे गेली कित्येक वर्ष कोणत्याच प्रकारची चोरीची एकही तक्रार पोलीस स्टेशन व महावितरण दप्तरी नाही, असे आदर्श धानोरा गांव आहे असे मत संतोषभाऊ सोमवंशी यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमास कार्यकारी अभियंता संजय पोवार, औसा उपअभियंता प्रदीप काळे, कनिष्ठ अभियंता अजित रणखांब, हिप्परसोगा गांवचे सरपंच मनोज सोमवंशी, कुमठा गांवचे सरपंच आनंद जगताप, उजनी सहाय्यक अभियंता शिंदे, औसा ऑफिसचे काकडे, विद्युत सहाय्यक अरविंद सूर्यवंशी, आकाश मस्के, लोदगा शाखेचे जनमित्र नरहरे, पवार रुपनावर, बहादुरे तसेच सोसायटी चेअरमन विक्रम पाटील, ग्राम पंचायत सदस्य बालाजी जनमले, अंगदराव कोळपे, बब्रुवान पाटील, जीवन पाटील, आदींसह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने