नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव मतदार नोंदणी शिबीर व युवा संवाद हा कार्यक्रम संपन्न

नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव मतदार नोंदणी शिबीर व युवा संवाद हा कार्यक्रम संपन्न 
औसा/प्रतिनिधी -तालुक्यातील खरोसा येथील 
नवभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव मतदार नोंदणी शिबीर व युवा संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी   हाश्मी  यांनी  01 जानेवारी  2024 रोजी  18 वर्षे पूर्ण होणाऱ्या  व्यक्तींची  नवमतदार म्हणून नाव नोंदणी करणे, मयत झालेल्या मतदाराचे नाव वगळणे,स्थलांतरीत मतदारांचे नाव कमी करणे , मतदार यादीतील चुकीचे नाव दुरूस्त करणे इ. कामे या शिबीरातून करण्यात येत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तथा प्राचार्य परमेश्वर स्वामी होते, प्रमुख पाहुणे म्हणून  मंडळ अधिकारी आर. एस. हासमी, तलाठी एस. एन. गवारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एल ओ मनोज मुसांडे यांनी केले. प्रास्ताविक नोडल अधिकारी प्रा. दत्तात्रय सुरवसे यांनी केले. यावेळी बी एल ओ. संजय पाटील, बी एल ओ राऊतराव व्ही व्ही  यांची उपस्थिती होती.  सदर कार्यक्रमाची जनजागृती गावात मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. 
यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने