प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे वतीने निवेदन

प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे वतीने निवेदन नगरपंचायत दिव्यांग राखीव ५%निधि तात्काळ देण्यात यावे

श्रमिक क्रांती अभियांन संघटना
महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर पाठिंबा जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड अजणीकर,

देवणी/ प्रतिनिधी- तालुक्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे वतीने २०/१०/२०२३ रोजी नगरपंचायत कार्यालय येथे नगरपंचायत दिव्यांग राखीव ५℅निधी तात्काळ वाटप करावे यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन कोन्ही दखल घेतली नाही म्हणून जर दिव्यांगाना राखीव पाच टक्के निधी लवकरात लवकर नाही दिल्यास देवणी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव नगरपंचायत समितीच्या समोर दि २८ /१०/२०२३ रोजी तिव्र आंदोलन करण्यात येईल जर आंदोलन दरम्यान दिव्यांग बांधवांना काही बरे वाईट झाले तर सर्वस्वी जबाबदार नगरपंचायत,अधिकारी व प्रशासन राहिल यांची नोंद घ्यावी हि नम्र विनंती या निवेदनात ज्ञानेश्वर भोसले तालुकाध्यक्ष देवणी, ज्ञानेश्वर शिंदे मनिषा पांचगे महिला देवणी तालुका तालुकाध्यक्ष, बालाजी सुर्यवंशी गुरनाळ, हंसराज गायकवाड, संगिता कलबुर्गे संजिव चव्हाण, सरस्वती गरड, कृष्णा साळुंके, प्रकाश डब्बे, प्रदिप धनुरे, विश्वनाथ घोपे,राजकुमार एनकुरे,मनोज कांबळे, पवण डब्बे,श्रीमंत कांबळे आदी सह उपस्थित होते,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने