उदगीर येथील पत्रकार श्रीनिवास सोनी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या राजकुमार मालशेट्वार यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करा

उदगीर येथील पत्रकार श्रीनिवास सोनी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या राजकुमार मालशेट्वार यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करा
देवणी/ प्रतिनिधी-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुक्याच्या वतीने  साप्ताहिक उदगीर समाचार चे संपादक श्रीनिवास सोनी यांना उदगीर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात रुग्णालयातील स्टोअर प्रमुख राजकुमार मलशेट्वार अर्वाच्य  भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ देवणी तहसील कार्यालयात दि.९ ऑक्टोबर रोजी निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला. दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की उदगीर येथील जेष्ठ पत्रकार श्रीनिवास सोनी हे शुक्रवारी रोजी   सामान्य रुग्णालयात असलेल्या उपलब्ध औषध साठ्याची माहीती घेण्यासाठी  रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक  डॉ. ए.बि. महिंद्रकर यांच्या दालनात पुर्व परवानगी घेवुन  गेले असता त्यांच्याकडे वस्तुनिष्ठ माहीती उपलब्ध नसल्याने संबधीत औषध निर्माण आधिकारी आर. डी. मालशेट्वार यांना दालनात ओषध साठा नोंदवही घेवुन येण्यास आदेशित केले होते. त्यांनी दालनात आल्यानंतर  पञकारास काय माहीती पाहीजे हे जानुण घेण्या आगोदरच अधिक्षका समोरच राजकुमार मालशेटवार यांनी आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पत्रकार श्रीनिवास सोनी यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
सदरील कर्मचाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कार्यवाही करून तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीचे निवेदन उपस्थित पत्रकारांच्या हस्ते देवणी  तहसील येथील पेशकार ओ.एस चिल्ले यांना देऊन निषेध करण्यात आले.निवेदनात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाअध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,शकील मणियार, जाकीर बागवान,प्रताप कोयले, बालाजी टाळीकोटे,जयेश ढगे,नरेश बिरादार,बालाजी कवठाळे, गिरीधर गायकवाड, अनवरखां पठाण,भैय्यासाहेब देवणीकर, कृष्णा पिंजरे,आदी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने