ॲड.गुणाले यांची ‘अन्वी’ला सदिच्छा भेट

ॲड.गुणाले यांची ‘अन्वी’ला सदिच्छा भेट
 लातूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील प्रसिध्द विधिज्ञ ॲड. व्ही. डी. गुणाले यांनी येथील सूतमिल कंपाऊंड परिसरात असलेल्या अन्वी गर्ल्स् हॉस्टेलला सदिच्छा भेट दिली असता, प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी सुधाकर गुणाले, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, मारुती गित्ते आदी उपस्थित  होते. यावेळी ॲड. गुणाले यांनी अत्याधुनिक, लिफ्ट स्वीमिंग पूलसह सर्व सुविधा असलेल्या या हॉस्टेलची पाहणी केली. यावेळी गुणाले म्हणाले की, लातूर ही शिक्षणाची पंढरी म्हणून उदयास आली आहे. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी लातुरात येतात. लातुरात हॉस्टेलची संख्या मोठी आहे. मात्र, एक चांगले व सर्व सुविधायुक्त हॉस्टेल कसे असावे याचे उदाहरण हे अन्वी गर्ल्स् हॉस्टेल आहे. येथे विद्यार्थिनींसाठी सुरक्षीत, शांत व स्वच्छ वातावरण, नाश्ता व रुचकर जेवणाची उत्तम सोय आहेच. पण त्यांच्यासाठी या हॉस्टेलमध्ये वातानुकुलीत अभ्यासिका, कंटाळा आल्यास स्वीमिंग पूलचा वापर, पिण्यासाठी आरओचे शुध्द पाणी, प्रत्येक खोलीत अटॅच बाथरुम, आरोग्य तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध, हॉस्टेल व हॉस्टेल परिसरावर २४ तास सी. सी. टी. व्ही. कॅमेर्‍यांची नजर, आईस्क्रिम आणि दर रविवारी फिस्ट या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील वातावरण विद्यार्थिनींना अभ्यासासाठी पोषक आहे. विद्यार्थिनींनी मन लावून अभ्यास करून आपले व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे, असा सल्ला या हॉस्टेलमध्ये राहणार्‍या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने