मराठवायातील ग्लोबल आडगाव चित्रपटा ची गोव्यात हवा

 मराठवायातील ग्लोबल आडगाव चित्रपटा ची गोव्यात हवा 

जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगाव चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.न्यूझीलंड, उत्तर कोरिया, रशिया अमेरिका, नायझेरिया येथील फिल्मेकर ने उदंड प्रतिसाद दिला ग्लोबल आडगाव च्या निवडीची घोषना  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मनोज कदम निर्मित ,अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित,अमृत मराठे सह-निर्मित ग्लोबल आडगाव गोव्यात रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र शासनाने फिल्म मार्केटसाठी निवडला आहे. सोबतच गिरकी आणि बटरफ्लाय हे मराठी चित्रपटांचीही  निवड करण्यात आली आहे.
अमेरीकेत नुकताच  ग्लोबल आडगाव या अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपटाचा बेस्ट रायटर अवॉर्ड पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद लेखनासाठी प्रख्यात सिने-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांना ऑस्करच्या धर्तीवर बेस्ट रायटर सन्मान मिळाला आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगावचा सन्मान म्हणजेच भारतीयांचा बहुमान होय.

आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त 
लेखक  अनिलकुमार साळवे दिग्दर्शित आणि शेतकरी पुत्र ,उद्योजक मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मीत व डॉ. सिद्धार्थ तायडे सहदिग्दर्शित "ग्लोबल आडगाव" मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील
यांच्यासह पाच सदस्यांच्या तज्ञ समितीने 30 चित्रपटामधून या चित्रपटाची काळजीपूर्वक निवड केली होती. आपली जोरदार कथा आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे ग्लोबल आडगाव 
या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले आहे.
 यंदा चित्रपटप्रेमिंच्या वर्तुळात 'ग्लोबलआडगाव' या मराठी चित्रपटाची   सकारात्मक चर्चा आहे. कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ग्लोबल आडगाव चित्रपटाची अकिरा कुरोसावा यांच्या चित्रपटाशी तुलना केली गेली. ही मराठी चित्रपट सृष्टीसाठी  अभिमान आणि गौरवाची बाब ठरली आहे.अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित, मनोज कदम निर्मीत आणि अमृत मराठे सह निर्मीत ग्लोबल आडगाव चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अमेरिकेने बेस्ट रायटर पुरस्कार दिल्याने भारतीय चित्रपट सृष्टीची  मान उंचावली आहे. सिल्व्हर ओक फिल्म्स अँड एंटरटेनमेंट निर्मित 
'ग्लोबलआडगाव' लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

''ग्लोबल आडगाव' हा बहुआयामी लेखक आणि पुरस्कार विजेते व्यक्तिमत्व डॉ.अनिलकुमार साळवे दिग्दर्शित एक बिग-बजेट चित्रपट आहे. अभिनेता प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.  
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह
'ग्लोबल आडगाव' हा चित्रपट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडण्यात आला आहे. तसेच अधिकृतपणे न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिका साठी निवडला आहे.या चित्रपटास देश-विदेशातील नामवंत प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.नुकत्याच संपन्न झालेल्या अजंता_एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अशोक कानगुडे याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जगातील प्रसिद्ध चित्रपट महोत्सवापैकी एक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे.महाराष्ट्र शासनआयोजित  तेराव्या  यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिलव्हर ओक फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत प्रख्यात  सिने लेखक-दिग्दर्शक अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित
 मनोज कदम निर्मित व अमृत मराठे सहनिर्मित,   प्रा.डॉ. सिद्धार्थ तायडे अभिनित-सहदिग्दर्शित 
बहुचर्चित 'ग्लोबल आडगाव' चित्रपटाची निवड करण्यात आली.

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा गौरव ठरलेल्या
प्रेक्षकांना भावनिक करणाऱ्या 'ग्लोबल आडगाव'या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, उपेंद्र लिमये, अनिल नगरकर, सिद्धी काळे, शिवकांता सुतार, अशोक कानगुडे, महेंद्र खिल्लारे, रौनक लांडगे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, डॉ. सिद्धार्थ तायडे, साहेबराव पाटील,प्रदीप सोळंके, रानबा गायकवाड, विष्णू भारती,जालिंदर केरे, विक्रम त्रिभुवन,विष्णू चौधरी, परमेश्वर कोकाटे, प्राजक्ता खिस्ते, ऋषिकेश आवाड विक्की गुमलाडू,मंगेश तुसे यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत.प्रख्यात गायक आदर्श शिंदे , डॉ. गणेश चंदनशिवे आणि जसराज जोशी यांनी गीतांना स्वरसाज चढविला आहे. प्रसिध्द गीतकार डॉ.विनायक पवार, प्रशांत मांडपुवार, अनिलकुमार साळवे यांच्या गीतांना समीक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. प्रशांत जठार, निर्मिती व्यवस्थापक सागर देशमुख, छायाचित्रण गिरीश जांभळीकर, संगीत विजय गावंडे, ध्वनी विकास खंदारे, कलादिग्दर्शन संदीप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डीआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांनी केला आहे.
'ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृती त्याचबरोबर ग्लोबलायझेशनच्या विळख्यात अडकलेला शेतकरी ,ग्लोबलायझेशन मुळे शेतीचे झालेले नुकसान अशा महत्त्वाच्या विषयावर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलेले आहे. शेतीची झालेली दुर्दशा सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षक बघत असताना प्रेक्षक आपल्या डोळ्यातील पाण्यांना थांबू शकत नाही अशा अत्यंत भावनिक ,संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयाला या सिनेमाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आलेला आहे.'ग्लोबलआडगाव' लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने